भावना हरपून सारा गाव दिवसाची रात्र करतो...
जगाच्या पाठीवर माणसांच्या गर्दीत प्रत्येकजण रोज हरवतो...
नऊ पन्नासच्या मागे आणि पाच चाळीस मध्ये रोजच असा हरवतो...
असा रोजच्या धावपळीत प्रत्येकजण कुठेतरी आपलेपणाच्या शोधात असतो..
आयुष्यात लोकलच्या वारीमध्ये असा काहीतरी मनात स्वताशीच बडबड करत राहतो...
उगीच पूर्ण न होणाऱ्या स्वप्नांचा प्रवास लोकल मधेच करतो...
थकलेल्या पावलांनी घरी जेव्हा परततो तेव्हा भूतकाळात केलेल्या चुकीचा पश्याताप हातात पाणी देतो...
अन वरून खिशाला आग अन डोक्याला राग सप्रेम भेट देऊ लागतो...
इवलेसे पाऊले आपली मोजत मोजत कुणीतरी का होईना मग गोड गोड पापा देतो..
अचूक खिशाचा पेन घेऊन मग पुढील आयुष्याचे स्वप्ने उगाच ''सकाळ'' वर मांडू लागतो...
त्याच्या कच्च्या रेघोट्यातही मग सुख दिसू लागते तितक्यात किचेनमधून चहासाठी निरोप येतो...
दिवसभरातून आता कुठे जवळ जाऊन तिला सांगावे वाटते गुपित जरा कानात नेमका तेव्हाच दुधवाला बेल जोरात वाजवतो..
अश्या गरबडीत प्रत्येकजण स्वतःला खरच कुठेतरी खूप वर्षांपासून लांब सोडून आलेला असतो...
जबाबदारीच्या विशेषानाखाली प्रत्येकजण रोज असाच भरडला जात असतो....
-मी शब्दसखा..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा