सोमवार, १६ मे, २०११

आज वेडी सर उन्हात वेड लाऊन गेली .....

खरच आज हलकी सर आली अन मला कुणाची तरी आठवण दाटून आली ....
चित्त विचलित करत सर मग माझ्या मागून पुढे धावत गेली .....
सरींच्या पाऊलखुणा सोबत मला तिचीपण जाणीव करून सरींनी दिली ...
आता वय निघून गेले आहे ते कॉलेज मधले अल्लड त्या आठवणीत ती पुन्हा मला सर सोडून गेली....
परीसारखे मला स्पर्श ओला करून तिच्या सोनेरी क्षणात पुन्हा जागवून गेली...
आज उन्हात अचानक सर येऊन मातीचा सुगंध देऊन गेली...
सुगंध हा मातीचा पहिल्या सरीचा तिला खुप आवडायचा ...
तिच्या आवडीला साथ दरवर्षीचा पाऊस येऊन देयचा ....
अश्या पावसाची तिच्या मला ही सर स्मरणिका देऊन गेली ....
हलकेच मिठीत मला तिच्या पुन्हा हि वेडी सर सोडून गेली .....
वास्तवात नाही तरी अवास्तव तिचे रूप मेघांत दाखवून गेली...
वेड असते ग हे जग सारे प्रेमात .....
मलाही मग पुन्हा तिच्या आठवणीत ही वेडी सर वेड लाऊन गेली ....

-मी शब्दसखा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा