राधा :
मी तर तुमची अर्धांगिनी ...
दिसे जगास जिथे बासरी येई कानी...
चूक काही त्या मीरेची नाही ...
ना त्या गोपिकांची मी जगात तुमच्या नावाविना कुणी नाही...
माझे नाव तुमच्यामागे सतत आहे त्यांच्या प्रेमाला का बर किंमत नाही ....
मीरा :
माझ्या मनाला ठाव रे ...
किती दिलेस तू घाव रे ...
जरी हरविशी मला तूच दिशी..
या तीनही लोकात रे ....
का बावरा होतास तू माझ्या मग प्रेमास रे ...
ठाऊक आहे हा तुझा चेहरा अन मोहरा ...
किती मनाला बांध मी घालणार रे ...
कसे अडवू या मनाला तुझे आहे ते तुझ्पाशीच राहणार रे ...
गोपिका :
आम्हाला तू भावतोस ...
चक्क निसर्गाला ही बदलवतोस...
असा रंग निळा तुझा ...
इंद्रधनू होऊन आमच्या मनावर राज्य करतोस ...
आता आम्ही काय करायचे ...
तुझ्या आभासालाच आपले प्रेम समजून...
उरलेले आयुष्य ढकलायचे .....
कृष्ण :
मला ठाऊक असे काही नव्हते ...
किती कोण माझ्यात गुंतले ...
माझ्या सहवासाने इतका माझा प्रभाव पडेल ...
माझ्या बासरीची ताण कुणाला इतके वेड करेल ...
कसे सांगू राधे तुला काही कळत नाही...
यांच्या प्रेमाविना सुद्धा माझे आयुष्य पूर्ण होत नाही ....
किती प्रेम करावे कुणावर यांच्याकडून शिकावे....
अन आभासालाही सत्य रूप प्रेमाचे फक्त राधे ह्यांनाच देता येत असावे ....
-मी शब्दसखा ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा