सोमवार, १६ मे, २०११

काही दिवस .......

काही दिवस आता मला देवा अनोळखा जगापासून बनव ....
काही दिवस देवा मला ढगामाढेच लपव...
गोंदलेल्या आठवणीना देवा आता तू मिटव...
काही दिवस देवा मला एकांतात ठेव...
 क्षणात विसरलेत सगळे मला त्या क्षणाबाहेरच जरा ठेव...
काही दिवस नको तो गोंधळ; गर्दीचे शहर; नेहमीचीच वाट...
तसा जगू पण नाही शकत मी यांच्याविना देवा काहीच दिवस जरा अलिप्त ठेव...
पुन्हा तू नव्याने जमिनीवर सोडून दे ....
पाहीन मग जरा हसरी सांजवात ....
ओघळणारा सूर्य अन उमलणारा चंद्र ....
कानी कूजन होईल मग पैजणांचे ....
मग पुन्हा जमतील स्मृतीपटलावर थवे त्याच आठवणींचे ....

-मी शब्दसखा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा