रविवार, १५ मे, २०११

......प्रेमळ भांडण असेच असते......

किती सहज असते ना एखादयाचे मन दुखावणे...
सहज वागणे आपले किती असते एखादयासाठी जीव घेणे...
कल्पनाच करणे पण कठीण असते जेव्हा दुरावा असतो....
जेव्हा हवाहवासा असणारा सहवास ही क्षणात परका होतो...
इतका का रोष मनात मग दाटतो...
आपलाच राग मग  प्रेमाच्या आड जेव्हा येतो...
आठवणींना सुद्धा मग आपण दम देतो...
नका येऊ मनामध्ये असा उगाच फतवा प्रेमातल्या रागात काढतो...
खरच का हा राग दोघामध्ये गरजेचा असतो..
जेव्हा एकजण शांत तर दुसरा सतत बोलण्यासाठी तळमळत असतो...
क्षणिक रागामुळे सुंदर नाती का आपण तोडतो...
विचार करावा काही बोलण्यापूर्वी एखाद्याच्या मनाचा की त्याच्यावर काय बेतेन...
माझ्याविना माझ्याशिवाय कधी न कसे त्याचे जीवन उरेन..
दोघामधले कुणी जरी रागावले तरी दुसऱ्याने समजून घ्यायचं असते...
प्रेमाने विणलेल्या नात्याला बरोबरीने गुफायचे असते...
ताणल्याने तुटते अन आपुलकीने  सावरते हे ज्याचे त्याने समजून घेयचे असते...
प्रेमात एकदम टोकाचे असे कधीच भांडायचं नसते....
-मी शब्दसखा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा